आजच्या युवा पिढीसाठी विचार नियम फॉर युथ जीवनाच्या खेळात कोण बाजी मारणार? मित्रांनो, लहानपणी तुम्ही नक्कीच सापशिडीचा खेळ खेळला असणार! हो ना? या खेळात आपण कधी शिडीच्या मदतीने एकदम वर जातो, तर कधी आपले फासे उलटे पडतात. मग सापाच्या तोंडात जाऊन क्षणार्धात आपण खाली कोसळतो. पण जो खेळाडू वारंवार सापाच्या तोंडात न अडकता केवळ पुढे जातो तोच आधी जिंकतो. हा तर साधा खेळ आहे. पण आयुष्याच्या खेळात कोण बाजी मारतं? तर स्वतःच्या विचारांना योग्य दिशा देणारा आणि ‘विचार नियमा’चा फासा वापरुन शंभराव्या नंबरापर्यंत सहजपणे पोहोचू शकणारा खेळाडू यशोशिखरावर विराजमान होतो. काही तरूणांसाठी यशस्वी होणं खूपच सहज असतं, तर काहींना मात�... See more
आजच्या युवा पिढीसाठी विचार नियम फॉर युथ जीवनाच्या खेळात कोण बाजी मारणार? मित्रांनो, लहानपणी तुम्ही नक्कीच सापशिडीचा खेळ खेळला असणार! हो ना? या खेळात आपण कधी शिडीच्या मदतीने एकदम वर जातो, तर कधी आपले फासे उलटे पडतात. मग सापाच्या तोंडात जाऊन क्षणार्धात आपण खाली कोसळतो. पण जो खेळाडू वारंवार सापाच्या तोंडात न अडकता केवळ पुढे जातो तोच आधी जिंकतो. हा तर साधा खेळ आहे. पण आयुष्याच्या खेळात कोण बाजी मारतं? तर स्वतःच्या विचारांना योग्य दिशा देणारा आणि ‘विचार नियमा’चा फासा वापरुन शंभराव्या नंबरापर्यंत सहजपणे पोहोचू शकणारा खेळाडू यशोशिखरावर विराजमान होतो. काही तरूणांसाठी यशस्वी होणं खूपच सहज असतं, तर काहींना मात्र ते प्रचंड अवघड काम वाटतं. कुणाला कमी वेळेत उत्तम परिणाम प्राप्त होतात, तर काही थोडं वर चढल्यावर लगेच सापाच्या तोंडात अडकतात. थोडक्यात, त्यांच्या जीवनात ‘कभी खुशी, कभी गम’ हा खेळ सतत चालू असतो. कोणाकडे सुदृढ आरोग्याची संपत्ती असते, तर एखाद्याकडे पाहून वाटतं ‘यानं जणू आजाराशीच मैत्री केली आहे की काय!’ या जगात असंख्य युवक आहेत, पण बोटावर मोजण्याइतकेच लोक भविष्यात यशाचं शिखर गाठू शकतात. शिवाय त्या शिखरावर कायम टिकू शकतात. असं का होतं बरं? कारण काही युवकांकडे ‘विचार नियम’ नावाचा एक अद्भुत फासा असतो, जो त्यांना सतत यशाची शिडी चढण्याचं आणि सापालाही शिडी बनवण्याचं रहस्य सांगतो. मित्रांनो, तुम्हीही ‘विचार नियम फॉर युथ’ या पुस्तकाच्या मदतीनं निसर्गाचे खास नियम समजून घेत आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याच्या तंत्रात कुशल व्हा आणि हवं ते मिळवा. यशस्वी करीयर, खरे मित्र, सुखी कुटुंब, प्रेम, शांती, समृद्धी, वेळ, नात्यांमधील मृदुता, तनामनात भरपूर ऊर्जा, शुद्ध चारित्र्याची संपत्ती, यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं आणि जीवनाचं सौंदर्य वाढवणारं ज्ञान... अशा अगणित सकारात्मक गोष्टी मिळवण्याचं रहस्य प्रस्तुत पुस्तकात सामावलंय. तेव्हा यशाची शिडी चढण्यासाठी डबल क्लिक करायला तयार आहात?