पाच पांडवांची पत्नी पांचाली. तिच्या तोंडून महाभारताची कथा सांगताना हे पुस्तक स्त्रीची मतं मांडते. या पुस्तकातून पांचालीच्या आयुष्याचा मागोवा घेताना यज्ञाच्या ज्वालेतून झालेला जन्म, एकाकी बालपण, तिचा एकमेव सखा, तिचा प्राणप्रिय भाऊ, तिची निगूढ अशा कृष्णाशी असलेली वेगवेगळ्या स्तरांवरची मैत्री, तिचं लग्न, मातृत्व आणि पतीचा शत्रू असलेल्या रहस्यमय पुरुषाबद्दल तिला वाटणारं सुप्त आकर्षण या वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो - हे पुस्तक म्हणजे पुरुषांच्या जगात जन्मलेल्या एका स्त्रीची मन हेलावणारी कथा आहे.