विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या �... See more
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.