“मानवाच्या मनात जो कोणता विचार विश्वासपूर्वक उद्भवू शकतो, तो विचार प्रत्यक्षातही उतरवला जाऊ शकतो.”
तुम्ही विजेता म्हणूनच जन्मला आहात. प्रत्येक व्यक्तीमध्ये यशस्वितेचं बीज सामावलेलं असतं. तुम्ही तुमचं जग बदलू शकता! एखादी हवीशी गोष्ट घडून येण्यासाठी स्वत:समोर उच्च ध्येय ठेवून ते गाठण्याचा विश्वास बाळगायला हवा. हाच विश्वास प्रदान करण्याचे कार्य हे पुस्तक करते.
या पुस्तकाची वैशिष्ट्ये -
तुमच्या समस्या ओळखून, जाणून समस्यांचे समाधान करणारे हे पुस्तक एखाद्या हितचिंतक मित्राप्रमाणे मार्गदर्शन करते.
तुमच्यातील सकारात्मक मानसिक दृष्टिकोनाची जाणीव हे पुस्तक तुम्हाला करून देईल.
हे पुस्तक म्हणजे तुम�... See more

हे पुस्तक म्हणजे तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा एक नकाशाच आहे.
या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही आपल्या भविष्याची मनपसंत रचना करण्याचा आराखडा तयार करू शकता.
हे पुस्तक तुम्हाला स्वविकास घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा देईल.
थोडक्यात योग्य रीतीनं गोष्टी घडवून आणण्यामागचं गुपित, स्वत:ला प्रेरणा देणं, इतरांनाही प्रेरित करणं, आपल्या कामात समाधान शोधणं, आपली ऊर्जापातळी वाढवणं आणि एका चांगल्या व निरोगी आयुष्याचा आनंद मिळवणं, या सार्या गोष्टींसाठी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल.