वस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे २०१३ नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून �... See more
वस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे २०१३ नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.