विनोद जैतमहाल हे जालना येथील रहिवासी असून पत्रकार, कवी, गीतकार, नाट्यअभिनेते, वक्ते, लेखक म्हणून परिचित आहेत.
जन्म : १ डिसेंबर १९७१.
जन्मस्थळः तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)
मूळ गाव : बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)
शिक्षण : एम. ए. संस्कृत (साहित्य), जनसंवाद व पत्रकारिता पदवी (सुवर्णपदक विजेते), नाट्यशास्त्रात व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संगणक अभियांत्रिकी पदविका, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व उर्दू या भाषांचे अभ्यासक.
विविध क्षेत्रांतील अनुभव :
संगणक तंत्रज्ञ : विविध कंपन्यांमध्ये नोकरी व अनेक वर्षे याच क्षेत्रात व्यवसाय. (१९९२ ते २००५)
वृत्तनिवेदन व लेखन : ज... See more

वृत्तनिवेदन व लेखन : जालना व अहमदनगर येथे स्थानिक हिंदी टीव्ही न्यूज 'अभी तक'साठी. (२००३)
संपादक व उपसंपादक : दैनिक आनंद नगरी जालना व दैनिक दिव्य मराठी छ. संभाजीनगर येथे. (२००८ ते २०१६),
संस्कृत शिक्षक : आरएचव्ही इंग्लिश मेडियम स्कूल, जालना. २०१३ पासून.
कंटेंट लेखक : एआर मीडिया, लातूर. २०२१ पासून.
सल्लागार संपादक : विश्वव्यापी मराठी डिजिटल दैनिक 'आधुनिक केसरी'साठी. (२०२१ पासून).
नाट्य व कलाक्षेत्रातील प्रवास :
महाराष्ट्र शासन आयोजित राज्य नाट्यस्पर्धेत १९९५ पासून सतत सहभाग.
'दलपतसिंग येती गावा' नाटकात भूमिका व गीतलेखन. लेखन मकरंद साठे, राजकुमार तांगडे, दिग्दर्शन प्रख्यात रंगकर्मी अतुल पेठे.
'म्हादू' या मराठी चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक. दिग्दर्शक संदेश भंडारे.
'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या व्यावसायिक नाटकात 'शाहीर मिलिंद कांबळे' ही मुख्य भूमिका. संकल्पना शाहीर संभाजी भगत, लेखन राजकुमार तांगडे, दिग्दर्शन नंदू माधव. निर्मिती रंगमळा, भगवान मेदनकर.
लेखन :
प्रख्यात गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर यांच्यासाठी उर्दू मानपत्र व माहितीपटाचे लेखन. (अजंता-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, छ. संभाजीनगर येथे माहितीपट प्रदर्शित.) (२०२३)
पथनाट्ये, एकांकिका : उत्तर तुमच्या खिशात, वी द पीपल (इंग्रजी), जिवंत असाल तर या, धारदार (एकांकिका).
लघुपट : 'आष्टी १९४२ एक वीरगाथा' (हिंदी पटकथा, संवाद, गीते, पार्श्वगायन.) यासह अनेक लघुपट.
ब्लॉग : एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पोर्टलवर ब्लॉगलेखन, 'शब्द काय सांगतात?' हा व्युत्पत्तिविषयक ब्लॉग.
पुस्तक : 'समाज माध्यमांवरील लेखनकौशल्ये' (ऑगस्ट २०२४, साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर) डॉ. बा. आं. म. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समावेश. (२०२४)
पुरस्कार :
विविध क्षेत्रांतील कार्यासाठी दैनिक आधुनिक केसरीचा 'आयडॉल महाराष्ट्र २०२४' पुरस्कार वेरूळ येथे प्रदान.