Vedh Mahamanavacha Dr.Shrinivas Samant | वेध महामानवाचा डॉ.श्रीनिवास सामंत छातीत निर्भय श्वास दे साथीस कणखर हात दे। फुत्कारणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे || ध्येय दे उत्तुंग मंगल अढळ कैलासापरी । कारुण्य निर्मळ वाहू दे हृदयातूनी गंगेपरी ।। दीनदुबळ्यां रक्षणारे शस्त्र दे माझ्या करी । दुःशासनांच्या दानवी रुधिरात धरती न्हाऊ दे ॥ निष्पाप जे ते रूप तुझे उमजु दे माझे मला । धर्म, जाति, पंथ यांच्या तोड आता शृंखला || नवीन गगने नवीन दिनकर नवीन चंद्राच्या कला । या नव्या विश्वात तुझ्या न्याय नीती नांदू दें ॥ छातीत निर्भय श्वास दे… देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.