श्री गजानन या दैवताशी कोकणाचा विशेष जवळचा संबंध आहे. कोकणात वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीला मालवणी भाषेत 'चौथ' म्हणतात. मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दोन कोकणी माणसे एकमेकांना भेटली की, चवथीला जाणार आहेस ना? असे एकमेकाला विचारतात. कोकणप्रांतात गणपतीला वेगळे आगळे महत्त्व आहे. ते का? असा प्रश्न अनेकांना मनात निर्माण होतो. माझ्या मते त्याचे एक नैसर्गिक, भौगोलिक कारण आहे. कोकणात पाऊस खूप पडतो. पावसाळ्याच्या दिवसात तर काहीवेळा घराबाहेर पडणेही कठीण होते. त्यावेळी फावल्या वेळेचे काम म्हणून तो स्वतः आपल्या घरची गणपतीची मूर्ती बनवीत असे. एखाद्याचा हात त्या मूर्तीवर चांगला बसल्... See more
श्री गजानन या दैवताशी कोकणाचा विशेष जवळचा संबंध आहे. कोकणात वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीला मालवणी भाषेत 'चौथ' म्हणतात. मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दोन कोकणी माणसे एकमेकांना भेटली की, चवथीला जाणार आहेस ना? असे एकमेकाला विचारतात. कोकणप्रांतात गणपतीला वेगळे आगळे महत्त्व आहे. ते का? असा प्रश्न अनेकांना मनात निर्माण होतो. माझ्या मते त्याचे एक नैसर्गिक, भौगोलिक कारण आहे. कोकणात पाऊस खूप पडतो. पावसाळ्याच्या दिवसात तर काहीवेळा घराबाहेर पडणेही कठीण होते. त्यावेळी फावल्या वेळेचे काम म्हणून तो स्वतः आपल्या घरची गणपतीची मूर्ती बनवीत असे. एखाद्याचा हात त्या मूर्तीवर चांगला बसल्याचे वाटले की त्याचे सगळे सगेसोयरे, आप्तमित्र आपापल्या मूर्ती त्याच्याकडूनच बनवून घेत. याच मूर्तीची स्थापना श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी होत असे. कोकणातील गणेश मंदिराची एकत्रीत सांगोपांग माहिती सचित्र स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. विद्याधर ठाणेकर यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. या पुस्तकाचे निर्मितीमूल्यही उच्च दर्जाचे आहे. ह्या पुस्तक निर्मितीचा जणूकाही ठाणेकरांनी ध्यासच घेतला होता. त्यांच्या या ध्यासाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले ही गणेशकृपाच म्हटली पाहिजे. केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे गणेशभक्त हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवतील, याबद्दल मला शंका नाही. --- ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर