दुर्गमहर्षी नामक नरदुर्ग प्रमोद मांडे' मांडे भाऊंचं संपूर्ण आयुष्य गडकिल्ल्यांशी बांधलं गेलेलं होतं. थोडंथोडकं नाही तर तब्बल ४० वर्ष मांडे भाऊ व्रतस्थ आयुष्य जगले. जळी स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त आणि फक्त गड किल्लेच दिसायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'गड किल्ले महाराष्ट्राचे' ग्रंथ सुसज्ज करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. साधारण १९६७ साली सुरु झालेला त्यांचा गडप्रवास २००७ मध्ये, म्हणजे तब्बल ४० वर्षांनी ग्रंथरुपातून प्रगटला. या ४० वर्षात त्यांनी महाराष्ट्रातला एकूण एक गड अभ्यासून घेतला. मग ते सह्याद्रीतल्या रांगेतले डोंगरी किल्ले असोत, समुद्री किल्ले असोत, वनदुर्ग असोत की भुईकोट अस�... See more
दुर्गमहर्षी नामक नरदुर्ग प्रमोद मांडे' मांडे भाऊंचं संपूर्ण आयुष्य गडकिल्ल्यांशी बांधलं गेलेलं होतं. थोडंथोडकं नाही तर तब्बल ४० वर्ष मांडे भाऊ व्रतस्थ आयुष्य जगले. जळी स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त आणि फक्त गड किल्लेच दिसायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'गड किल्ले महाराष्ट्राचे' ग्रंथ सुसज्ज करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. साधारण १९६७ साली सुरु झालेला त्यांचा गडप्रवास २००७ मध्ये, म्हणजे तब्बल ४० वर्षांनी ग्रंथरुपातून प्रगटला. या ४० वर्षात त्यांनी महाराष्ट्रातला एकूण एक गड अभ्यासून घेतला. मग ते सह्याद्रीतल्या रांगेतले डोंगरी किल्ले असोत, समुद्री किल्ले असोत, वनदुर्ग असोत की भुईकोट असोत सर्व किल्ल्यांचे त्यांनी स्वतः वणवण भटकून हजारो छायाचित्रांच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण केलं. जिल्ह्या-जिल्ह्यातल्या किल्ल्यांची बयाजवार यादीच त्यांनी केली. याआधी एवढी चपखल-प्रामाणिक आणि स्वतः फिरून अशी यादी कोणीच केली नव्हती. 'मांडे भाऊंच्या या अपूर्व कष्टातुनच महाराष्ट्रातील ३९५ किल्ल्यांचा समग्र गडकोश (रंगीत छायाचित्रे, दिशादर्शक नकाशे, जिल्हावार किल्ल्यांचे नकाशे) सिद्ध झाला.