प्रस्तावना इंडियाज एन्शन्ट पास्ट हे पुस्तक माझ्याच 'एन्शन्ट इंडिया' ह्या पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. 'एन्शन्ट इंडिया' ह्या पुस्तकाचे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण समितीने १९७७मध्ये प्रथम प्रकाशन केले; पण ह्याच समितीने ह्यातील काही भाग 'संदिग्ध आणि पुरेसे स्पष्टीकरण देणारा नाही' असा आक्षेप घेऊन १९७८मध्ये ह्या पुस्तकाचे वितरण खंडित केले. १९८० मध्ये ह्या पुस्तकाच्या काही लाख प्रती विद्यार्थ्यांसाठी छापल्या गेल्या. नंतर २००१ साली एनसीइआरटीने हे पुस्तक पुनःप्रकाशित केले, तेव्हा त्यातील काही भाग लेखकाच्या संमतीशिवाय त्यातून वगळला होता. अखेर, एनसीइआरटीने अत्यंत संदिग्ध मजकुराचे कारण स�... See more
प्रस्तावना इंडियाज एन्शन्ट पास्ट हे पुस्तक माझ्याच 'एन्शन्ट इंडिया' ह्या पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. 'एन्शन्ट इंडिया' ह्या पुस्तकाचे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण समितीने १९७७मध्ये प्रथम प्रकाशन केले; पण ह्याच समितीने ह्यातील काही भाग 'संदिग्ध आणि पुरेसे स्पष्टीकरण देणारा नाही' असा आक्षेप घेऊन १९७८मध्ये ह्या पुस्तकाचे वितरण खंडित केले. १९८० मध्ये ह्या पुस्तकाच्या काही लाख प्रती विद्यार्थ्यांसाठी छापल्या गेल्या. नंतर २००१ साली एनसीइआरटीने हे पुस्तक पुनःप्रकाशित केले, तेव्हा त्यातील काही भाग लेखकाच्या संमतीशिवाय त्यातून वगळला होता. अखेर, एनसीइआरटीने अत्यंत संदिग्ध मजकुराचे कारण सांगून हे पुस्तकही बाजारातून काढून घेतले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने माझ्याशी संपर्क केला, त्या वेळी मी आधीच प्रकाशित झालेल्या पुस्तकात सुधारणा करायचे ठरवले. ह्या वेळी मी फार विचारपूर्वक मोठ्या प्रमाणात बदल केले. शिवाय आणखी चार नव्या प्रकरणांचाही त्यात समावेश केला. ह्या सुधारणा आणि बदल करताना मी माझ्याकडे असलेली माहिती मांडताना नव्या कल्पनांचा अवलंब केला, जास्त माहितीचा समावेश केला. या पुस्तकात इ.स.पूर्व ७व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा समावेश केला आहे. हे पुस्तक पदवीपूर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य वाचकांसाठी लिहिले असल्याने त्यातील इंग्रजीव्यतिरिक्त वापरलेल्या भाषांमधील शब्दांसाठी उच्चारचिन्हे वापरलेली नाहीत. प्रत्येक प्रकरणानुसार संदर्भ टाळले असले, तरी प्रत्येक प्रकरणातील माहितीसाठी वापरलेल्या संदर्भग्रंथांची यादी पुस्तकाच्या शेवटी दिली आहे. या पुस्तकाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांना मिळालेली लोकप्रियता ह्या आवृत्तीलाही मिळाली, तर आनंदच आहे.