१२ व्या शतकापासून तर अठराव्या शतकापर्यंतचा काळ हा भारताच्या इतिहासात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास' म्हणून ओळखला जातो. इ.स. पूर्व ६ व्या शतकापासून भारतावर परकीय आक्रमणास सुरूवात झाली होती. इराणी, ग्रीक, शक, कुषाण, हूण यांनी जवळ जवळ एक हजार वर्ष भारताचा इतिहास गाजविला ही सर्व आक्रमणे संपल्यावर परकीय मुसलमानांची आक्रमणे सुरू झालीत. इ.स. १२०६ ते १७६१ ह्या प्रदीर्घ कालखंडात गुलाम वंश, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद वंश, लोदी वंश आणि शेवटी मोगल घराणे ह्यांनी भारतावर राज्य केले. हरीहर आणि बुक्क या दोन भावांनी तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. विजयनगर साम्राज्याचा उदयास्त ह�... See more
१२ व्या शतकापासून तर अठराव्या शतकापर्यंतचा काळ हा भारताच्या इतिहासात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास' म्हणून ओळखला जातो. इ.स. पूर्व ६ व्या शतकापासून भारतावर परकीय आक्रमणास सुरूवात झाली होती. इराणी, ग्रीक, शक, कुषाण, हूण यांनी जवळ जवळ एक हजार वर्ष भारताचा इतिहास गाजविला ही सर्व आक्रमणे संपल्यावर परकीय मुसलमानांची आक्रमणे सुरू झालीत. इ.स. १२०६ ते १७६१ ह्या प्रदीर्घ कालखंडात गुलाम वंश, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद वंश, लोदी वंश आणि शेवटी मोगल घराणे ह्यांनी भारतावर राज्य केले. हरीहर आणि बुक्क या दोन भावांनी तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. विजयनगर साम्राज्याचा उदयास्त हे दक्षिण भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व आहे. प्रस्तुत पुस्तकात पुरातत्वीय साधने, वाङ्मयीन साधने तसेच परकीय प्रवाशांची प्रवासर्णने, तत्कालिन सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचे वर्णन, स्थापत्य कला, वास्तूकला, चित्रकला व संगीत कला, प्रशासन व्यवस्था, सैन्य व्यवस्था, युद्धपद्धती, विविध प्रसंगी झालेल्या लढाया, शिक्षण पद्धती तसेच तत्कालिन समाजजीवनाचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला असून, सदरील पुस्तक हे सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.