ही त्याच सिंधची कथा आहे, जो कधीकाळी भारतवर्षाचा अविभाज्य भाग होता आणि ज्याचा उल्लेख भारताच्या राष्ट्रगीतात केलेला आहे. सातव्या शतकाच्या मध्यावर धर्मध्वज आणि तलवारी हाती घेऊन अरबांनी आपलं विजयी अभियान सुरू केलं. इस्लामच्या स्थापनेनंतर अवघ्या शंभर वर्षाच्या आत इराण्यांचं सासानी आणि रोमनांचं बायझन्टाईन साम्राज्य त्यांनी धुळीला मिळवलं. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रीका खंड आपल्या टाचेखाली आणला. भारताच्या गळ्यालाही त्यांची तलवार भिडली. सागर आणि खुष्कीच्या मार्गाने सन ६३७ पासून एकूण १४ आक्रमणे त्यांनी सिंधवर केली. सिंधच्या शूर वीरांनी ती सर्व परतवून लावली. सन ७१२च्यो सुरुवातीला झालेल्या १५व्या आक्रमण... See more
ही त्याच सिंधची कथा आहे, जो कधीकाळी भारतवर्षाचा अविभाज्य भाग होता आणि ज्याचा उल्लेख भारताच्या राष्ट्रगीतात केलेला आहे. सातव्या शतकाच्या मध्यावर धर्मध्वज आणि तलवारी हाती घेऊन अरबांनी आपलं विजयी अभियान सुरू केलं. इस्लामच्या स्थापनेनंतर अवघ्या शंभर वर्षाच्या आत इराण्यांचं सासानी आणि रोमनांचं बायझन्टाईन साम्राज्य त्यांनी धुळीला मिळवलं. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रीका खंड आपल्या टाचेखाली आणला. भारताच्या गळ्यालाही त्यांची तलवार भिडली. सागर आणि खुष्कीच्या मार्गाने सन ६३७ पासून एकूण १४ आक्रमणे त्यांनी सिंधवर केली. सिंधच्या शूर वीरांनी ती सर्व परतवून लावली. सन ७१२च्यो सुरुवातीला झालेल्या १५व्या आक्रमणाचा सेनापती होता, मुहम्मद बिन कासिम. सिंधचा राजा राय दाहिर सेन निधड्या छातीने त्याच्याशी लढला आणि रणांगणावर धारातीर्थी पडला. ही कहाणी आहे, आक्रमक अरबांनी केलेल्या सिंधच्या धुळधाणीची. भीषण संहाराची. अनन्वित अत्याचाराची. हा इतिहास आहे, मायभूमीच्या रक्षणासाठी राजा दाहिर आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या असामान्य लढ्याचा आणि अमर बलिदानाचा.