लौकिक अर्थाने यशस्वी असणार्या पालकांचं घर सतराव्या वर्षी सोडून भरारी घेणार्या एलॉन मस्कचा प्रवास दिसतो तितका चकचकीत, आकर्षक नाही. दक्षिण आफ्रिकेतील यादवीच्या काळात एका श्वेतवर्णीय मुलाने जन्म घेतला आणि हा मुलगा सगळ्याच अर्थांनी ‘वेगळा’ ठरला. प्रणेत्यांचा वारसा, भग्न कुटुंबाचे चटके, असामान्य बुद्धिमत्ता आणि विज्ञान काल्पनिका वास्तवात आणण्याच्या ध्यासातून जगाला मिळाला ‘एलॉन मस्क.’
अब्जाधीश, भविष्याचा शिल्पकार, वादाचा केंद्रबिंदू किंवा परोपकारी उद्योजक काहीही म्हणा; पण एलॉन आज जगातील सर्वांत श्रीमंत, प्रसिद्ध आणि ध्यासवेड्या लोकांच्या यादीत अग्रणी आहे. भूलोक, अंतराळ आणि पाताळ अशा त्रिलोकी... See more
लौकिक अर्थाने यशस्वी असणार्या पालकांचं घर सतराव्या वर्षी सोडून भरारी घेणार्या एलॉन मस्कचा प्रवास दिसतो तितका चकचकीत, आकर्षक नाही. दक्षिण आफ्रिकेतील यादवीच्या काळात एका श्वेतवर्णीय मुलाने जन्म घेतला आणि हा मुलगा सगळ्याच अर्थांनी ‘वेगळा’ ठरला. प्रणेत्यांचा वारसा, भग्न कुटुंबाचे चटके, असामान्य बुद्धिमत्ता आणि विज्ञान काल्पनिका वास्तवात आणण्याच्या ध्यासातून जगाला मिळाला ‘एलॉन मस्क.’
अब्जाधीश, भविष्याचा शिल्पकार, वादाचा केंद्रबिंदू किंवा परोपकारी उद्योजक काहीही म्हणा; पण एलॉन आज जगातील सर्वांत श्रीमंत, प्रसिद्ध आणि ध्यासवेड्या लोकांच्या यादीत अग्रणी आहे. भूलोक, अंतराळ आणि पाताळ अशा त्रिलोकीचा स्वामी होण्याची स्वप्नं बाळगून असणार्या एलॉन मस्कला त्याचा ‘का?’ सापडला आहे आणि कदाचित मोठ्या, धाडसी कल्पनांकडे आपलं बोट धरून आपल्याला नेण्याचं काम एलॉनने केलं आहे. एलॉनचा हा अचाट, विस्मयकारक प्रवास आपल्यालाही मोठी स्वप्नं बघण्यास प्रवृत्त करेल हे नक्की.