माकोन्दो इथल्या जिप्सींच्या वार्षिक भेटीच्या आगमनाची वार्ता वेगवेगळ्या पिपाण्या आणि नगारे यांच्या कल्लोळामुळे सहजच मिळायची. नव्यानेच वसलेल्या त्या गावात होझे औरेलियानो बुयेंदियाने त्याची ठाम वृत्तीची बायको अर्सूला हिच्याबरोबर सहजीवनाला नव्यानेच सुरुवात केली होती. गूढ मेल्कियादेस, त्याने लावलेले शोध, साहसाच्या त्याच्या कथा या सगळ्यांमुळे औरेलियानो बुयेंदिया आणि त्याच्या वडिलांना उत्कंठता जाणवत असे. त्या वृद्ध जिप्सीने त्या दोघांच्या हातात ठेवलेल्या हस्तलिखिताचा अर्थ त्यांना क नव्हता आणि त्याचं महत्त्वही ते दोघं जाणू शकत नव्हते. गूढ, जादुई, उत्कंठावर्धक अशी ही कथा म्हणजे अनाकलनीय शैलीने ... See more
माकोन्दो इथल्या जिप्सींच्या वार्षिक भेटीच्या आगमनाची वार्ता वेगवेगळ्या पिपाण्या आणि नगारे यांच्या कल्लोळामुळे सहजच मिळायची. नव्यानेच वसलेल्या त्या गावात होझे औरेलियानो बुयेंदियाने त्याची ठाम वृत्तीची बायको अर्सूला हिच्याबरोबर सहजीवनाला नव्यानेच सुरुवात केली होती. गूढ मेल्कियादेस, त्याने लावलेले शोध, साहसाच्या त्याच्या कथा या सगळ्यांमुळे औरेलियानो बुयेंदिया आणि त्याच्या वडिलांना उत्कंठता जाणवत असे. त्या वृद्ध जिप्सीने त्या दोघांच्या हातात ठेवलेल्या हस्तलिखिताचा अर्थ त्यांना क नव्हता आणि त्याचं महत्त्वही ते दोघं जाणू शकत नव्हते. गूढ, जादुई, उत्कंठावर्धक अशी ही कथा म्हणजे अनाकलनीय शैलीने जिवंत झालेला कॅलिडोस्कोपच आहे.