ही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही! जगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच.या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत. लहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला... तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराह... See more
ही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही! जगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच.या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत. लहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला... तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही... पण प्रेम असं सोयीने करता येतं का ? अनेक पेच, अनेक प्रश्न... प्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक आंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची धर्मापलीकडे जाणारी ----------------------------------------------------------Dharmresha Olandtana या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. या मुलाखतीमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशापद्धतीनं जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली, या तऱ्हेच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे.