'घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या ब... See more
'घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.