अश्वमेध २०२४ The question isn't who is going to let me; it's who is going to stop me. -Ayn Rand इथे जिंकण्याची लढाई भाजपा किंवा मोदी-शहा लढताना दिसत नाहीत. त्यांनी सर्व विरोधकांना आव्हान दिलेले आहे आणि आवाहनही केलेले आहे. आम्हांला कोणाशी लढण्याची खुमखुमी नाही. ज्याला कोणाला तशी मस्ती असेल, त्याने आम्हांला रोखून दाखवावे, असाच मोदी-शहांचा पवित्रा नाही काय? अश्वमेध यज्ञ करणारा राजा इतरांची भूमी पादाक्रांत करीत नाही, तर त्यांना आपले वर्चस्व मान्य करून त्यांनी भविष्यात आव्हान देऊ नये, इतकेच सांगत असतो. मोदी किंवा भाजपा यावेळच्या म्हणजे २०२४च्या अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यापेक्षा वेगळे वागताना दिसत आहेत का? आपल्या महत्त्वाकांक्ष�... See more
अश्वमेध २०२४ The question isn't who is going to let me; it's who is going to stop me. -Ayn Rand इथे जिंकण्याची लढाई भाजपा किंवा मोदी-शहा लढताना दिसत नाहीत. त्यांनी सर्व विरोधकांना आव्हान दिलेले आहे आणि आवाहनही केलेले आहे. आम्हांला कोणाशी लढण्याची खुमखुमी नाही. ज्याला कोणाला तशी मस्ती असेल, त्याने आम्हांला रोखून दाखवावे, असाच मोदी-शहांचा पवित्रा नाही काय? अश्वमेध यज्ञ करणारा राजा इतरांची भूमी पादाक्रांत करीत नाही, तर त्यांना आपले वर्चस्व मान्य करून त्यांनी भविष्यात आव्हान देऊ नये, इतकेच सांगत असतो. मोदी किंवा भाजपा यावेळच्या म्हणजे २०२४च्या अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यापेक्षा वेगळे वागताना दिसत आहेत का? आपल्या महत्त्वाकांक्षा व उद्दिष्टांचा घोडा त्यांनी सोडलेला आहे. ज्याची हिंमत असेल, त्याने तो अडवावा. त्याला दोन हात करावे लागतील. नसेल, तर भाजपाचे प्रभुत्व स्वीकारावे, असाच एकूण निवडणुकीचा रागरंग नाही काय? बघुया, एकविसाव्या शतकातला हा अश्वमेधाचा घोडा कोण अडवू शकतो आणि कुठे कुठे ही राष्ट्रवादाच्या प्रभुत्वाची लढाई प्रत्यक्ष लढली जाते? मे महिन्याच्या अखेरीस आपल्यासमोर त्याचे चित्र स्पष्ट झालेले असेलच. कारण त्यातच इतिहासाचे भविष्य दडलेले आहे.