सुकृतपूर्ण, उदात्त, नीतिरम्य अशा या अद्भुत पौराणिक साध्वी चरित्रांत, वास्तविक माझे असे काहीच नाही. महामुनि व्यासप्रणित महाभारतातील भारतीय मूळ कथेत सूत्ररूपाने ग्रथित झालेले दिव्य द्रौपदी चरित्र, पांडवप्रतापासारख्या प्रासादिक मराठी ग्रंथातून वाचीत असता, प्रसंगोपात्त आधुनिक वाचनाभिरूची वाङ्मय कादंबरीपानाची हौस, साफल्ये करून पूर्ण झाल्याचा मला स्फूर्तिदायक प्रत्यय आल्यावरून, तोच नवलकथा भाग एकत्र करून हे चरित्र लिहिण्याचा अल्प प्रयत्न मजकरवी त्याच स्फूर्तिने आज तडीस नेला आहे. जुनी गोष्ट काहीशा नव्या आवडीच्या चटकदार भाषेत लिहिण्याची, माझ्या योग्यतेबाहेरची ही एक छोटी खटपट आहे. ती कितपत साधली आ�... See more
सुकृतपूर्ण, उदात्त, नीतिरम्य अशा या अद्भुत पौराणिक साध्वी चरित्रांत, वास्तविक माझे असे काहीच नाही. महामुनि व्यासप्रणित महाभारतातील भारतीय मूळ कथेत सूत्ररूपाने ग्रथित झालेले दिव्य द्रौपदी चरित्र, पांडवप्रतापासारख्या प्रासादिक मराठी ग्रंथातून वाचीत असता, प्रसंगोपात्त आधुनिक वाचनाभिरूची वाङ्मय कादंबरीपानाची हौस, साफल्ये करून पूर्ण झाल्याचा मला स्फूर्तिदायक प्रत्यय आल्यावरून, तोच नवलकथा भाग एकत्र करून हे चरित्र लिहिण्याचा अल्प प्रयत्न मजकरवी त्याच स्फूर्तिने आज तडीस नेला आहे. जुनी गोष्ट काहीशा नव्या आवडीच्या चटकदार भाषेत लिहिण्याची, माझ्या योग्यतेबाहेरची ही एक छोटी खटपट आहे. ती कितपत साधली आहे, हे रसिक बंधुभगिनी वाचक, सहृदयतेने पाहतीलच.