महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी. जशी पर्वतरांगा, नद्या, वनं, शेती-भाती या सगळ्याने ही भूमी संपन्न आहे तशीच अनेक सुंदर, वास्तुकलेचे उत्तम नमुने असलेली प्राचीन-आधुनिक मंदिरं सुद्धा या भूमीची शोभा वाढवतात. अर्थात या मंदिरांची माहिती, त्याचा इतिहास हे सारं काही आपल्याला माहित नसतं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते मंदिर पाहणंही शक्य होत नाही. महाराष्ट्र तसं मोठं राज्य आहे त्यामुळे कोकणातल्या मंडळींना मराठवाड्यातली मंदिरं किंवा खान्देशातल्या मंडळींना मावळ प्रदेशातली मंदिरं ठाऊक नसतात. 'गाभारा' या पुस्तकाने मात्र आपली ही उत्तम सोय करून दिली आहे. अनेक परिचित आणि अपरिचित मंदिरांची माहि�... See more
महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी. जशी पर्वतरांगा, नद्या, वनं, शेती-भाती या सगळ्याने ही भूमी संपन्न आहे तशीच अनेक सुंदर, वास्तुकलेचे उत्तम नमुने असलेली प्राचीन-आधुनिक मंदिरं सुद्धा या भूमीची शोभा वाढवतात. अर्थात या मंदिरांची माहिती, त्याचा इतिहास हे सारं काही आपल्याला माहित नसतं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते मंदिर पाहणंही शक्य होत नाही. महाराष्ट्र तसं मोठं राज्य आहे त्यामुळे कोकणातल्या मंडळींना मराठवाड्यातली मंदिरं किंवा खान्देशातल्या मंडळींना मावळ प्रदेशातली मंदिरं ठाऊक नसतात. 'गाभारा' या पुस्तकाने मात्र आपली ही उत्तम सोय करून दिली आहे. अनेक परिचित आणि अपरिचित मंदिरांची माहिती आणि त्या मंदिराला अप्रत्यक्ष भेट घडवून आणण्याची शक्ति हे 'गाभारा' या पुस्तकाचं आणि एका अर्थाने लेखकाचं वैशिष्ट्यच! डॉ. धनश्री लेले