या पुस्तकातून लेखक वाचकांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचा असा मार्ग दाखवतात, ज्या मार्गावर चालत लाखो लोकांनी शून्यापासून सुरुवात करून महान यश प्राप्त केलं आहे. लेखकाने या पुस्तकात सांगितलेल्या 21 सिद्धान्तांवर काम करून तुम्ही कोणतंही ध्येय साध्य करू शकता. मग ते कितीही मोठं का असेना... त्याशिवाय आपल्या व्यक्तिगत शक्ती कशा ओळखाव्यात, आपल्या आयुष्यात सर्वांत मौल्यवान काय आहे, भविष्यात आपल्या मनाजोग्या उपलब्धी मिळवण्यासाठी चित्त कसं एकाग्र करावं, हेही या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा वाढवू शकता, तुमच्या मार्गात येणारी प्रत्येक समस्या, अडचण कशी सोडवू शकत... See more
या पुस्तकातून लेखक वाचकांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचा असा मार्ग दाखवतात, ज्या मार्गावर चालत लाखो लोकांनी शून्यापासून सुरुवात करून महान यश प्राप्त केलं आहे. लेखकाने या पुस्तकात सांगितलेल्या 21 सिद्धान्तांवर काम करून तुम्ही कोणतंही ध्येय साध्य करू शकता. मग ते कितीही मोठं का असेना... त्याशिवाय आपल्या व्यक्तिगत शक्ती कशा ओळखाव्यात, आपल्या आयुष्यात सर्वांत मौल्यवान काय आहे, भविष्यात आपल्या मनाजोग्या उपलब्धी मिळवण्यासाठी चित्त कसं एकाग्र करावं, हेही या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा वाढवू शकता, तुमच्या मार्गात येणारी प्रत्येक समस्या, अडचण कशी सोडवू शकता, अडचणींतून कसे बाहेर येऊ शकता, आव्हानांना कसे सामोरे जाऊ शकता आणि प्रत्येक ध्येय कसं साध्य करू शकता, हेही लेखक यामध्ये सांगतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकात तुम्ही यशाची एक अनुभवलेली पद्धत शिकाल, जिचा उपयोग तुम्ही आयुष्यभर करू शकता.