'जे सुरू कराल ते पूर्ण करा' हे पुस्तक म्हणजे 'कार्यक्षमतेने कामे पूर्ण करण्याच्या शास्त्रातील' एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. आपली कामं कधी, कुठे आणि का अडकतात याविषयी पुस्तकामध्ये विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. तसेच त्यावरील उपाय पायरी पायरीने दिले आहेत. हे उपाय असे आहेत जे तुम्ही लगेचच अंमलात आणू शकता. कुठलंही काम सातत्य राखून ते कसं पूर्ण करायचं याच्या पायऱ्या पुस्तकामध्ये मिळतील. अगदी प्रॉडक्टिव्हिटी प्रोफेशनल्सनाही या पुस्तकातून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकामुळे तुम्ही तुमचा मेंदू, मन आणि स्वभाव चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल, ज्याचा उपयोग अपेक्षित परिणाम मिळ�... See more
'जे सुरू कराल ते पूर्ण करा' हे पुस्तक म्हणजे 'कार्यक्षमतेने कामे पूर्ण करण्याच्या शास्त्रातील' एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. आपली कामं कधी, कुठे आणि का अडकतात याविषयी पुस्तकामध्ये विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. तसेच त्यावरील उपाय पायरी पायरीने दिले आहेत. हे उपाय असे आहेत जे तुम्ही लगेचच अंमलात आणू शकता. कुठलंही काम सातत्य राखून ते कसं पूर्ण करायचं याच्या पायऱ्या पुस्तकामध्ये मिळतील. अगदी प्रॉडक्टिव्हिटी प्रोफेशनल्सनाही या पुस्तकातून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकामुळे तुम्ही तुमचा मेंदू, मन आणि स्वभाव चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल, ज्याचा उपयोग अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी होईल.