'क्रिकेट कॉकटेल' हे पुस्तक म्हणजे क्रिकेटची नशा वाढविणारं एक कॉकटेल आहे, एखाद्या 'ब्लडीमेरी' किंवा 'सिंगापूर स्लिंग' कॉकटेलसारखं. त्यात सचिन, सेहवाग, बॅडमन, स्टीव्ह वॉ, कपिलदेव, चंदू बोर्डे, अझरुद्दीन, विव्ह रिचर्डस् यांसारख्या खेळाडूंच्या मैदानावरच्या पराक्रमाची व्होडका आहे. मैदानाबाहेरच्या गंमती-जंमतीचा टोमॅटो ज्यूस आहे आणि तुलनात्मक कौतुकाचा टोबॅस्को सॉस आहे. द्वारकानाथ संझगिरींची लेखनशैली ही कॉकटेलच्या ग्लासाला जे मीठ लावलं जातं तशी आहे. त्याने ह्या कॉकटेलची लज्जत वाढते आणि डोक्यात नशा तरळत राहते...