२०२१ - २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पु�... See more
२०२१ - २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पुस्तक क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच वाचनीय आहे.