प्राचीन काळापासून वेगवेगळ्या शतकात जन्मलेले, वेगवेगळ्या देशांमधील, विविध जातीजमातींचे लोक नाथ संप्रदायातील आदिनाथांपासून मत्स्येन्द्रनाथांसह सर्व नवनाथांची पूजा करीत आले आहेत. अनेक शतकांच्या कालावधीत या दैवतांनी विविध अवतार घेतले. भूतलावरील मर्त्य लोकांना संसारातील दुःखांमधून मुक्ती मिळावी, म्हणून त्यांनी उपदेश केला. जिथे केवळ शुद्ध आनंद आणि शांती आहे, अशा आत्मोद्धाराच्या मार्गाची दिशा त्यांनी लोकांना दाखवली. अवघड योगमार्ग साधक सांसारिकांसाठी खुला करण्याचे काम गोरक्षनाथांनी केले. तत्कालीन शैव आणि वज्रयान बौद्ध धर्मांना एकत्र आणणारा धागा म्हणून गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथांचे कार्य विलक्षण... See more
प्राचीन काळापासून वेगवेगळ्या शतकात जन्मलेले, वेगवेगळ्या देशांमधील, विविध जातीजमातींचे लोक नाथ संप्रदायातील आदिनाथांपासून मत्स्येन्द्रनाथांसह सर्व नवनाथांची पूजा करीत आले आहेत. अनेक शतकांच्या कालावधीत या दैवतांनी विविध अवतार घेतले. भूतलावरील मर्त्य लोकांना संसारातील दुःखांमधून मुक्ती मिळावी, म्हणून त्यांनी उपदेश केला. जिथे केवळ शुद्ध आनंद आणि शांती आहे, अशा आत्मोद्धाराच्या मार्गाची दिशा त्यांनी लोकांना दाखवली. अवघड योगमार्ग साधक सांसारिकांसाठी खुला करण्याचे काम गोरक्षनाथांनी केले. तत्कालीन शैव आणि वज्रयान बौद्ध धर्मांना एकत्र आणणारा धागा म्हणून गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथांचे कार्य विलक्षण आहे. पुढे ज्ञाननाथ म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी कठीणतम अशा योगमार्गाने निर्गुणोपासना करण्यापेक्षा सगुण भक्तीचा सोपान चढून मुक्ती मिळवता येते, हे प्रतिपादन केले, तेही नाथ पंथाच्या कालानुरूप लवचिकतेला अनुसरूनच! गोरक्षनाथांच्या कार्याचा आढावा घेताना तत्कालीन समाजात प्रभावी असलेले धर्म, पंथ यांच्या कार्याचे स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. शुद्धता, निष्पापपणा, साधेपणा, (सत् - चित् - आनंद स्थिती) ही मूळ सत्य आत्मस्थिती आहे. ती स्थिती प्राप्त करण्याच्या साधनेत या पुस्तकाचा उपयोग होईल. लेखकाविषयी : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वचिंतक व जाणकार लेखक. 'कालनिर्णय' या विविध भाषांतील जगप्रसिद्ध दिनदर्शिकेचे व कालनिर्णय ब्रॅंडचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. सकाळ प्रकाशनातर्फे 'काली काला' हे पुस्तक प्रकाशित. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.