मुलं ही देशाची संपत्ती आणि भवितव्य आहेत. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे आवश्यक असते. उत्तम साहित्य हे चांगल्या संस्कारांचे साधन आहे. प्राचीन काळापासून अकबर- बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. या मनोरंजक कथा बिरबलाचे व्यवहारचातुर्य, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान, भाषिक व सामान्य ज्ञानाचे कौशल्य मुलांमध्ये हसत-खेळत रुजवणाऱ्या आहेत.
बिरबलाचे बौद्धिक कौशल्य अवगत करण्याचे सोपे मार्ग सांगणाऱ्या या कथा मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.
ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असणारा हा संग्रह प्रत्येक बालवाचकाच्या संग्रही असायलाच हवा.