आदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. आणि तरीही तो एका शब्दाभोवती, एका वेदनेभोवती, सत्तालालसेनने झालेल्या विध्वंसाच्या विविध छटांभोवती फिरत राहतो. हा संग्रह आजच्या हिंसक काळावर भाष्य करणारा कवितासंग्रह आहे. माणसात लपलेल्या हिंस्त्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीने सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या म�... See more
आदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. आणि तरीही तो एका शब्दाभोवती, एका वेदनेभोवती, सत्तालालसेनने झालेल्या विध्वंसाच्या विविध छटांभोवती फिरत राहतो. हा संग्रह आजच्या हिंसक काळावर भाष्य करणारा कवितासंग्रह आहे. माणसात लपलेल्या हिंस्त्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीने सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे त्याच्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोहोचवतो.