माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' याम... See more
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आलीआहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे. आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे. थोडक्यात काय तर मंगेशकरांच्यासोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे. स्वकष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणिकलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे. -- शांता शेळके