श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे आत्मकथन हे चरित्र म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हे; तर ही संतुलनाची गोष्ट आहे! परमेश्वरी तत्त्व नित्य असतं पण अवताररूपात ‘सम्भवामि युगे युगे’ ही प्रतिज्ञा सत्य करतं, तसंच हे संतुलन अनादि आहे. सृष्टीच्या प्रारंभीसुद्धा माया होती आणि परमात्मा होता, आदिशक्ती होती आणि संकल्पनास्वरूप परमतत्त्व होतं. म्हणूनच युगानुयुगे चालत आलेल्या या संतुलनाची गोष्ट सर्वांना सांगण्यासाठीचं हे लेखन. श्री गुरुजी जन्माला आले आणि जीवनात त्यांना जे जे काही करता आलं, त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव आले, साक्षात दर्शनं झाली, वेळोवेळी देव मदतीला धावून आला असे सर्व अनुभव श्री गुरुजी या लेखनातून सु... See more
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे आत्मकथन हे चरित्र म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हे; तर ही संतुलनाची गोष्ट आहे! परमेश्वरी तत्त्व नित्य असतं पण अवताररूपात ‘सम्भवामि युगे युगे’ ही प्रतिज्ञा सत्य करतं, तसंच हे संतुलन अनादि आहे. सृष्टीच्या प्रारंभीसुद्धा माया होती आणि परमात्मा होता, आदिशक्ती होती आणि संकल्पनास्वरूप परमतत्त्व होतं. म्हणूनच युगानुयुगे चालत आलेल्या या संतुलनाची गोष्ट सर्वांना सांगण्यासाठीचं हे लेखन. श्री गुरुजी जन्माला आले आणि जीवनात त्यांना जे जे काही करता आलं, त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव आले, साक्षात दर्शनं झाली, वेळोवेळी देव मदतीला धावून आला असे सर्व अनुभव श्री गुरुजी या लेखनातून सुहृदांना सांगतात. त्याचप्रमाणे परमेश्वराचं कार्य करण्याच्या उद्देशानेच आपण जन्म घेऊन इथे आलेलो आहोत याचं भान सर्वांना यावं, सर्वांनी अशा परमेश्वरी योजनेप्रमाणे जनता-जनार्दनासाठी काही ना काही करण्याची प्रेरणा घ्यावी, हाही या आत्मचरित्राचा एक उद्देश आहे.