महाप्रस्थान : महाभारताच्या अंतरंगाचा वेध घेणारी कादंबरी भास्कर जाधव लिखित महाप्रस्थान या कादंबरीमध्ये महाभारताच्या युद्धाच्या पहिल्या दिवसापासून पांडवांच्या महाप्रस्थानापर्यंतचा कालखंड शब्दबद्ध करण्यात आला आहे. संपूर्ण महाभारताचे सार याच कालखंडात येऊन सामावलेले आहे. हा कालखंड म्हणजे एक ज्वलंत धगधगता ज्वालामुखीच आहे. त्यातील धग, दाह, वेदना, संवेदना, दुःख, श्वास - निश्वास, उसासे - हुंदके, आक्रन्दन आणि अश्रुपात, तसेच शोध - प्रतिशोध, संघर्ष व अट्टाहास, यश - अपयश, हे सारं मानवी भावभावनांचं प्रतिनिधित्व करणारं आहे. महाप्रस्थान ही महाभारताचा आशय आणि वेगळ्या धाटणीचा अविष्कार यांनी मूर्त झालेली एक सुंदर क�... See more
महाप्रस्थान : महाभारताच्या अंतरंगाचा वेध घेणारी कादंबरी भास्कर जाधव लिखित महाप्रस्थान या कादंबरीमध्ये महाभारताच्या युद्धाच्या पहिल्या दिवसापासून पांडवांच्या महाप्रस्थानापर्यंतचा कालखंड शब्दबद्ध करण्यात आला आहे. संपूर्ण महाभारताचे सार याच कालखंडात येऊन सामावलेले आहे. हा कालखंड म्हणजे एक ज्वलंत धगधगता ज्वालामुखीच आहे. त्यातील धग, दाह, वेदना, संवेदना, दुःख, श्वास - निश्वास, उसासे - हुंदके, आक्रन्दन आणि अश्रुपात, तसेच शोध - प्रतिशोध, संघर्ष व अट्टाहास, यश - अपयश, हे सारं मानवी भावभावनांचं प्रतिनिधित्व करणारं आहे. महाप्रस्थान ही महाभारताचा आशय आणि वेगळ्या धाटणीचा अविष्कार यांनी मूर्त झालेली एक सुंदर कादंबरी आहे.