करकरेंना कोणी व का मारले ? | एस.एम. मुश्रीफ | पुस्तक नव्हे, पुराव्यासह दोषारोप पत्र महाराष्ट्राचे ए.टी.एस. प्रमुख हेमंत करकरे करीत असलेल्या मालेगांव २००८ बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये अनेक महत्वाचे व पक्के पुरावे मिळाले होते व त्यामुळे ब्राम्हण्यवाद्यांच्या देशभर बॉम्बस्फोट घडविण्याच्या देशद्रोही कटाचा पर्दाफाश होत होता. म्हणून ब्राम्हण्यवाद्यांनी हेमंत करकरेंना थांबविण्याचा कसून प्रयत्न केला. त्यांना अनेक आमिषे दाखविली व धमक्याही दिल्या, पण ते दबले नाहीत व त्यांनी आपले काम जोमाने चालू ठेवले. करकरे कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत व कोणत्याही धमकीला भीक घालीत नाहीत असे दिसून आल्यानंतर ब्राह्मण्य�... See more
करकरेंना कोणी व का मारले ? | एस.एम. मुश्रीफ | पुस्तक नव्हे, पुराव्यासह दोषारोप पत्र महाराष्ट्राचे ए.टी.एस. प्रमुख हेमंत करकरे करीत असलेल्या मालेगांव २००८ बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये अनेक महत्वाचे व पक्के पुरावे मिळाले होते व त्यामुळे ब्राम्हण्यवाद्यांच्या देशभर बॉम्बस्फोट घडविण्याच्या देशद्रोही कटाचा पर्दाफाश होत होता. म्हणून ब्राम्हण्यवाद्यांनी हेमंत करकरेंना थांबविण्याचा कसून प्रयत्न केला. त्यांना अनेक आमिषे दाखविली व धमक्याही दिल्या, पण ते दबले नाहीत व त्यांनी आपले काम जोमाने चालू ठेवले. करकरे कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत व कोणत्याही धमकीला भीक घालीत नाहीत असे दिसून आल्यानंतर ब्राह्मण्यवाद्यांनी त्यांना ठार मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांना ब्राह्मण्यवाद्यांच्या संपूर्ण नियंत्रणात असलेल्या आय.बी. या गुप्तचर यंत्रणेने मदत केली. मुंबईच्या ताज व ऑबेरॉय या हॉटेलवर व नरीमन हाऊस या ज्यू लोकांच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्यासाठी येत असलेल्या पाकिस्तानच्या लष्करे तोयबा च्या अतिरेक्यांच्या बोटीची इंत्तंभूत माहिती आय.वी. ला मिळाली असताना ती त्यांनी जाणीवपूर्वक दाबून ठेवली व तो हल्ला होऊ दिला; पण त्याचवेळी त्यांनी एक समांतर हल्ला घडवून आणला. त्यांना रॉ या भारताच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेकडून अतिरेक्यांच्या ३५ मोबाईलचे नंबर मिळाले होते. त्यावरून त्यांना अतिरेकी नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी हल्ला करणार आहेत याची माहिती मिळाली होती. त्या माहितीचा गैरवापर करून अगदी त्याच वेळी त्यांनी सी.एस.टी., कामा हॉस्पीटल व रंगभवन लेन येथे ब्राह्मण्यवादी संघटनांच्या अतिरेक्यांकडून समांतर हल्ला घडवून आणला व तो पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला असा आभास निर्माण केला.