वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची, विरुद्ध सवयींची दोन माणसं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि आपापल्या सहजीवनाला सुरुवात करतात. सहजीवनाचं हे नातं कसंही असो... लग्नाचं, लिव्ह-इन किंवा प्रेमप्रकरण... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांचेही जीवन बहरण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय? आपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसातीकरण अशी तंत्रे नात्यात ताण आले तर त्यांच्यावर कशी मात करावी? नात्यातील व्यभिचाराची प्�... See more
वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची, विरुद्ध सवयींची दोन माणसं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि आपापल्या सहजीवनाला सुरुवात करतात. सहजीवनाचं हे नातं कसंही असो... लग्नाचं, लिव्ह-इन किंवा प्रेमप्रकरण... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांचेही जीवन बहरण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक अनुरूप जोडीदार म्हणजे नेमकं काय? आपला अनुरूप जोडीदार कसा निवडावा? जोडीदाराकडून काय अपेक्षा असाव्यात? आपलं नातं आयुष्यभर टिकण्यासाठी काय करावे? स्वीकार, तडजोड, आत्मसातीकरण अशी तंत्रे नात्यात ताण आले तर त्यांच्यावर कशी मात करावी? नात्यातील व्यभिचाराची प्रकरणं कशी हाताळावी? मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या सहजीवनात पालकांची भूमिका काय असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक. समृद्ध सहजीवनासाठी नेमकं कधी, काय आणि कसं याची अनुकरणीय आणि सहजसोपी तंत्रं लेखकाविषयी : डॉ. प्रतिभा देशपांडे नातेसंबंधांतील गुंतागुंत, वैवाहिक समस्या आणि मानसिक आघातांचे व्यवस्थापन याविषयीच्या समुपदेशनामध्ये कार्यरत. मानसिक आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग. मानवी नातेसंबंध आणि भावभावना समजून घेण्याला समर्पित असलेली मराठी आणि इंग्लिश मिळून एकूण १८ पुस्तके प्रकाशित मानसशास्त्र विषयावर आधारित पन्नासहून अधिक पॉडकास्ट ‘मानसशास्त्रीय प्रथमोपचार’ या विषयात डॉक्टरेट. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून मानसोपचार, समुपदेशन यांचे अभ्यासक्रम