माझे शालेय शिक्षण विदर्भामधे वाशीम इथे झाले. नंतर इंजिनियरिंग करता भोपाळला गेलो. १ वर्ष नाशिकला विमान कारखान्यात ओझर इथे नोकरी केली आणि नंतर पुण्याला सध्याच्या टाटा मोटर्स मध्ये रिटायरमेंट पर्यंत म्हणजे २००९ पर्यंत छान नोकरी झाली. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत, घरी किंवा ऑफिस मधे, 'नाही' च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र आय एस ओ ९००० या स्टॅंडर्ड च्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच 'री',निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात �... See more
माझे शालेय शिक्षण विदर्भामधे वाशीम इथे झाले. नंतर इंजिनियरिंग करता भोपाळला गेलो. १ वर्ष नाशिकला विमान कारखान्यात ओझर इथे नोकरी केली आणि नंतर पुण्याला सध्याच्या टाटा मोटर्स मध्ये रिटायरमेंट पर्यंत म्हणजे २००९ पर्यंत छान नोकरी झाली. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत, घरी किंवा ऑफिस मधे, 'नाही' च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र आय एस ओ ९००० या स्टॅंडर्ड च्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच 'री',निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरु राहिली. अगदी सुरवातीला वाचक वर्ग ओळखीच्या ईमेल वाचकांपुरताच मर्यादित होता. नंतर लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाईम्स / बित्तमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिध्दी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके, आणि वॉट्स अप, फेसबुक अशा माध्यमांमुळे परीघ खूप वाढत गेला........ . याआधी लिहिलेली २ पुस्तके - १) म्हैस आणि २) काही आहे का ? काही आहे का ? हि अमेझॉन वर उपलब्ध आहेत. यांना पण छान प्रतिसाद मिळत आहे. अशाप्रकारे सगळ्यांच्याच सहकार्यामुळे वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरु आहे. माझ्या काही लेखांचं संकलन आता 'हसती खेळती बायको' या पुस्तकात केले आहे. आपल्याला हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते.
- अभिप्राय जरूर पाठवावा. -सुधीर करंदीकर