गॅरी जॉन बिशप स्कॉटलंडमध्ये जन्म होऊन तिथेच लहानाचे मोठे झालेले गॅरी 1997 मध्ये अमेरिकेला गेले आणि त्यांना व्यक्तिगत विकासाच्या अभ्यासाच्या जणू नव्या वाटाच सापडल्या. विशेषत: ऑण्टोलॉजी (प्राणिमात्रांवर विचार करणाऱ्या) आणि फेनॉमेनॉलॉजी (मानवाच्या आत्मिक उन्नतीबद्दल विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या) या शाखांत त्यांनी अनेक वर्षे कठोर आणि काटेकोरपणे प्रशिक्षण घेतले. नंतर त्यांनी व्यक्तिगत विकासाच्या क्षेत्रामध्ये जगात अग्रेसर असणाऱ्या एका कंपनीत उच्चपदावर काम करण्यास सुरुवात केली. बरीच वर्षे जगातील हजारो लोकांना मार्गदर्शन केल्यानंतर अभ्यास सुरू केला, त्यावेळी ते मार्टिन हैडेगर, हॅन्स जॉर्ज गॅ... See more
गॅरी जॉन बिशप स्कॉटलंडमध्ये जन्म होऊन तिथेच लहानाचे मोठे झालेले गॅरी 1997 मध्ये अमेरिकेला गेले आणि त्यांना व्यक्तिगत विकासाच्या अभ्यासाच्या जणू नव्या वाटाच सापडल्या. विशेषत: ऑण्टोलॉजी (प्राणिमात्रांवर विचार करणाऱ्या) आणि फेनॉमेनॉलॉजी (मानवाच्या आत्मिक उन्नतीबद्दल विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या) या शाखांत त्यांनी अनेक वर्षे कठोर आणि काटेकोरपणे प्रशिक्षण घेतले. नंतर त्यांनी व्यक्तिगत विकासाच्या क्षेत्रामध्ये जगात अग्रेसर असणाऱ्या एका कंपनीत उच्चपदावर काम करण्यास सुरुवात केली. बरीच वर्षे जगातील हजारो लोकांना मार्गदर्शन केल्यानंतर अभ्यास सुरू केला, त्यावेळी ते मार्टिन हैडेगर, हॅन्स जॉर्ज गॅडामर आणि एडमंड हसेर्ल यांच्या तत्त्वज्ञानाने विशेष प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतःची ‘अर्बन फिलॉसॉफी’ नावाची कंपनी स्थापन केली. लोकांची मानसिक क्षमता वाढवून त्यांच्या जीवनात खराखुरा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा गॅरी यांनी जणू वसाच घेतलेला आहे आणि ही तळमळ त्यांना प्रत्येक दिवशी कार्यरत ठेवते. ‘कुणी निंदा कुणी वंदा’ असे त्यांचे धोरण असल्यामुळे त्यांचे विचार अनुसरणार्यांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत असून त्यांच्या विचारचा साधेपणा आणि प्रत्यक्ष जीवनात होणाऱ्या उपयोगांनी लोक प्रभावित होत आहेत. सध्या ते फ्लोरिडा येथे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. @GARYJOHNBISHOP GARYJOHNBISHOP.COM