शेअर मार्केट हे एक असं क्षेत्र आहे, ज्याचं सर्वांना जितकं आकर्षण असतं त्याहून जास्त त्याची भीती असते. बरं, सुरुवात करायची तर नक्की कुठून, आणि कधी? असे अनेक प्रश्न मनात असतात. मग समोर जे काही ज्या क्रमाने येईल तसे आपण वाचत - पाहत जातो, परिणामी भांडवली बाजार समजण्यापेक्षा मनात त्याबद्दल गोंधळच जास्त होतो. हेच ओळखून अगदी शेअरमार्केटच्या प्राथमिक माहितीनिशी महत्वाच्या संकल्पना या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.
ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करून, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक जरूर वाचावे.