शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चेचा समावेश असलेले हे पुस्तक br>जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. माणसाच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्देशाची सफलता हाच शिक्षणाचा उपयोग आहे, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्ती यांनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे. 'चांगुलपणा, सत्य किंवा देव यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याची ऊर्जा निर्माण करणे �... See more
शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चेचा समावेश असलेले हे पुस्तक br>जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. माणसाच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्देशाची सफलता हाच शिक्षणाचा उपयोग आहे, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्ती यांनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे. 'चांगुलपणा, सत्य किंवा देव यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याची ऊर्जा निर्माण करणे हे शिक्षणाचे कार्य आहे. त्यातूनच वैयक्तिकरीत्या चांगल्या व्यक्ती आणि पर्यायाने आदर्श नागरिक घडत असतात. आपल्या प्रवाहाला वळण देण्यासाठी नदीला दोन किनारे असतात. त्याचप्रमाणे शिक्षणामुळे निर्माण होणारी ऊर्जा जीवनातील सत्य जोपासण्यासाठी अविचल स्वयंशिस्त निर्माण करते. शेवटी नदी सागराचा शोध घेऊन त्यात विलीन होते. त्याप्रमाणे ही ऊर्जा आपले स्वातंत्र्य मिळवते.' 'देवाचा शोध घेणे हीदेखील आपली अडचण आहे, कारण तोच आपल्या जीवनाचा मूलभूत पाया आहे. पायाच पक्का नसेल तर त्यावरील घर दीर्घकाळ तग धरू शकणार नाही. त्याचप्रमाणे देव किंवा सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर सर्वकाही असूनही आपले जीवन निरर्थक बनते.'.