प्राक्कथन त्रिपिटक सम्यक सम्यकसम्बुद्धाच्या महान कल्याणकारी लोकमंगल परिणतप्रज्ञ उपदेशांचे संगायन (=संकलन = संग्रह) आहे. समग्र बुद्धशासन आहे. बुद्धवाणाचे शाश्वत आगर आहे. प्रज्ञेचा सागर आहे. मानवतेला पुरूषोत्तम करणारे 'व्यवहार' आणि 'परमार्थिक' उपदेश आहेत. व्यावहारिक उपदेश खरोखरच सोपे आणि सरळ वाटतात, ते उपदेश सरळ आणि सोपे नाहीत. ते गंभीर आहेत. परमार्थासारख्या दार्शनिक उपदेशाची खोली सखोल आहे. जो धम्म सुत्तपिटकात उपदेश रूप आहे, तोच धम्म विनयात संयमरूप (नियम) आहे, तर तोच धम्म अभिधम्मपिटकात तत्वरूप आहे. सुत्तपिटकात जरी बौद्ध परंपरेनुसार 'अधिचित्ताची' शिकवणूक आहे, विनयपिटकात ‘अधिशीलाची' शिकवणूक आहे तर अभिधम�... See more
प्राक्कथन त्रिपिटक सम्यक सम्यकसम्बुद्धाच्या महान कल्याणकारी लोकमंगल परिणतप्रज्ञ उपदेशांचे संगायन (=संकलन = संग्रह) आहे. समग्र बुद्धशासन आहे. बुद्धवाणाचे शाश्वत आगर आहे. प्रज्ञेचा सागर आहे. मानवतेला पुरूषोत्तम करणारे 'व्यवहार' आणि 'परमार्थिक' उपदेश आहेत. व्यावहारिक उपदेश खरोखरच सोपे आणि सरळ वाटतात, ते उपदेश सरळ आणि सोपे नाहीत. ते गंभीर आहेत. परमार्थासारख्या दार्शनिक उपदेशाची खोली सखोल आहे. जो धम्म सुत्तपिटकात उपदेश रूप आहे, तोच धम्म विनयात संयमरूप (नियम) आहे, तर तोच धम्म अभिधम्मपिटकात तत्वरूप आहे. सुत्तपिटकात जरी बौद्ध परंपरेनुसार 'अधिचित्ताची' शिकवणूक आहे, विनयपिटकात ‘अधिशीलाची' शिकवणूक आहे तर अभिधम्मपिटकात ‘अधिप्रज्ञांची' शिकवणूक आहे. त्रिपिटक तीन भागात आहे- १. सुत्तपिटक - बुद्धत्व प्राप्तीपासून तर महापरिनिब्बाणापर्यंत बुद्ध जेथे कोठे जे जे बोलले त्याचा संग्रह म्हणजे सुत्त. ते यापिटकात आहे. सुत्तन्त 'व्यवहार देसना' ( = दोहार - देशना ) आहे. २. विनयपिटक - यात संघानुशासन आहे. म्हणजे 'आज्ञा देसना' (= आणा देसना) आहे. ३. अभिधम्मपिटक निर्वाणाच्या शिखराकडे नेणारा पथिक (=वाटाड्या) म्हणजे अभिधम्म. अभिधम्म म्हणजे 'उच्चत्तर परमार्थ देसना' (परमत्थदेसना) आहे. बुद्धशासनाची अथवा त्रिपिटक वाङ्गमयाची भाषा 'मागधी' मागधी हीच उत्तरभारताची जिवंत भाषा होती. भगवंताने आपल्या मातृभाषेमध्येच उपदेश देणे योग्य मानले. त्यावेळचे गणराज्य व जनपदच्या भाषा म्हणजे लोकभाषा. पालि शब्द म्हणजे बुद्धवाणीची ओळ. समग्रसुत्तांचा प्राण. त्रिपिटक - सार संग्रहमागधीचा सन्मान. अठराव्या शतकात मागधिलाच 'पालि' हे नाव प्राप्त झाले. बुद्धशासनाची भाषा पालि झाली. पालिभाषा संस्कृतभाषा पेक्षा प्राचीन आहे. ‘छान्दस’ म्हणजे वेद-वेदांगाची भाषा. बुद्धवचनाला छांदसमध्ये करू नये असे शास्ता भिक्खूसंघास म्हणाले होते. जो करेल त्यास दुष्कृतचा दोष लागेल. जगविख्यात वैज्ञानिक डॉ, अल्बर्ट आईसस्टाईन म्हणतो की, भगवान बुद्धाने सर्व प्रथम वैज्ञानिक पद्धतीने विचार केला. बुद्ध हे जगातील पहिले महान वैज्ञानिक होत. भविष्यातील विश्वातील लोकांचा धर्म बुद्ध धम्मच असेल. त्रिपिटकात- १. विविध देसना आहे. २. त्रिपिटकात विविध शासन आहे. ३. त्रिपिटकात विविध कथा आहेत. ४. त्रिपिटकात विविध शिकवण आहे. ५. त्रिपिटकात विविध प्रहाण आहेत. आणि ६. त्रिपिटकात एका-एका पिटकाचे चार-चार गंभीरभाव आहेत. समग्र पालि त्रिपिटक व त्रिपिटकेत्तर वाङ्गमय मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही महाराष्ट्रातील २०० बौद्ध विद्वानाशी आमचा संपर्क सुरू आहे. एक-एक ग्रंथ ५-५ विद्वानांना देऊन हे अनुवाद कार्य पूर्ण होईल. हे सम्पूर्ण त्रिपिटक मराठी 'अनुवाद करण्याचा महाबोधि सभा सारनाथ ह्यांचा सम्यक संकल्प आहे. प्रकाशित ‘त्रिपिटक-सार संग्रह' ह्या प्रयत्नांची सुरवात आहे. समग्र त्रिपिटक वाङ्गमयाची ओळख आहे. आचार्य सूर्यकान्त भगत अहर्निश च कार्य करीत आहेत. ते आज ह्या क्षेत्रातील पालि वाङ्गमयाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा हा ग्रंथ आम्ही २९ वी धम्मपरिषद वटफळी (त.नेर,जि.यवतमाळ) येथे देशातील ५६ लोकांना 'धम्मभूषण' पुरस्कार देतांना त्यांच्या उपस्थितीत व हजारों उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत दि. ३ फरवरी २०२१ ला प्रकाशित केला.