डॉ. ब्रुस एच. लिप्टन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालणारे, नव्या जीवशास्त्राचे प्रणेते अशी त्यांची कीर्ती आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पेशीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून संशोधन केलं. अनेक टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांतून त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. Website. www.brucelipten.com.
"समर्थ, दिमाखदार आणि सुगम! सरळसोप्या भाषेत लिहिल्यामुळे लख्खपणे समजणाऱ्या या पुस्तकातून, सजीवता आणि ... See more
डॉ. ब्रुस एच. लिप्टन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालणारे, नव्या जीवशास्त्राचे प्रणेते अशी त्यांची कीर्ती आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पेशीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून संशोधन केलं. अनेक टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांतून त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. Website. www.brucelipten.com.
"समर्थ, दिमाखदार आणि सुगम! सरळसोप्या भाषेत लिहिल्यामुळे लख्खपणे समजणाऱ्या या पुस्तकातून, सजीवता आणि सजगता यांच्यातले आतापर्यंत अगम्य असलेले दुवे स्पष्ट झाले आहेत. याची फार गरज होती. हे दुवे समजावून देताना डॉ. लिप्टन आपल्या भूतकाळापासूनच्या जीवशास्त्राबद्दलच्या प्राचीनतम प्रश्नांची उत्तरे देतात आणि गहनतम रहस्ये उलगडतात. ‘द बायोलॉजी ऑफ बिलीफ’ हे पुस्तक नव्या सहस्रकातील विज्ञानाचा आधारस्तंभ ठरेल, याबद्दल मला किंचितही शंका नाही."
-ग्रेग ब्रॅडन The God Code And The Devine Matrixया लोकप्रिय पुस्तकाचे लेखक
"‘‘द बायोलॉजी ऑफ बिलीफ’’ हे उत्क्रांत होत असलेल्या मानवतेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रेरणादायी पुस्तकामध्ये डॉ. ब्रुस लिप्टन यांनी आपल्या अद्भुत संशोधनातून प्राप्त झालेले ‘मानव-विकास आणि बदलांचे नवे अधिक सुजाण विज्ञान’ मांडले आहे. जनुकीय आणि जैविक मर्यादांमध्येच आयुष्याचा अर्थ शोधण्याची सवय झालेल्या आपल्या बुद्धीसमोर या पुस्तकामुळे खऱ्या आत्मिक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मन आणि शरीर यांच्यातल्या नात्याचा अभ्यास करणार्यांनी वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे. "
-डॉ. जॉन एफ. डमार्टिनी Count Your Blessings & The Breakthrough Experience या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक
"आपल्या भावनांचा आपल्या जनुकांच्या प्रकट होण्यावर कसा परिणाम होतो, हे सहजसोप्या भाषेत सांगणारे आकर्षक पुस्तक शेवटी आलेच! तुम्ही तुमच्या जनुकांच्या मर्यादांचे बळी नाही, तर तुमच्या इच्छानुरूप शांत, आनंदी आणि प्रेममय आयुष्य जगण्यासाठीची अमर्याद क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे जाणून घेऊन त्याबद्दल कृतज्ञ होण्यासाठी तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचा."
-जोसेफ मर्कोला, डी.ओ. www. mercola.com या नैसर्गिक आरोग्याशी संबंधित प्रसिद्ध संकेतस्थळाचे संस्थापक
"अनुवंशशास्त्राच्या आतापर्यंत रूढ असलेल्या वर्चस्वाचं गुपित उलगडणारे, स्वत:ला आनुवंशिकतेचा बळी मानण्याच्या मानसिकतेला स्पष्ट धुडकावून लावणारे हे पुस्तक अत्यंत निर्भीड आणि नवी दृष्टी देणारे आहे. डॉ. लिप्टन यांच्या या प्रतिपादनासाठी त्यांनी क्वांटम जीवशास्त्रातील ठोस पुरावेही यात दिले आहेत. आपल्या मानसिक धारणाच आपलं आयुष्य घडवत असतात, ही माहिती डॉ. लिप्टन वाचकांना केवळ सांगतात असे नव्हे, तर अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे पटवूनही देतात. हे आपल्याला विचार करायला लावणारे, प्रेरणादायी पुस्तक आहे."
-ली पुलोस, Ph.D. A.B.P.P.,युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया Miracles & Other Realities & Beyond Hypnosis चे लेखक
"ज्या कोणाला आरोग्य, मानवजातीचे कल्याण आणि मानवजातीचे भविष्य याची चाड आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. या पुस्तकात मांडलेल्या दृष्टिकोनामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. ब्रुस लिप्टन यांनी केलेले संशोधन आणि त्याचा सारांश म्हणजे केवळ अद्भुत प्रज्ञेचा आविष्कार आहे."
-जेरार्ड डब्ल्यू. D.C. अध्यक्ष, Life Chiropractic College West