पेशवाईच्या अस्ताच्यावेळी या देशात ठगांनी व पेंढार्यांनी धुमाकूळ घातला होता. इतका की इंग्रज राज्यकर्त्यांना त्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्य ठेवावे लागले! कर्नल मेडोज टेलरने त्या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेतला होता. आपल्या "कन्फेशन्स ऑफ ठग " ( Confessions of a Thug ) या कादंबरीच्या प्रस्तावनेत तो लिहितो-- १८३९ साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीने इतिहास निर्माण केला. पूर्वी मराठीत या कादंबरीचा फ्क्त पूर्वार्ध प्रसिद्ध झाला आहे. संपर्ण कादंबरी निवेदनरूपाने मराठीत प्रथमच सादर करत आहोत. निवेदन केले आहे, प्रा. वा. शि. आपटे यांनी.