आरोग्याबद्दल आपण नेहमी असाच विचार करतो की, केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपले शरीर, मन आणि जीवनामध्ये शांती, उद्देश आणि संबंध प्रदान करतो; परंतु हार्टफुलनेस आणि राजयोगाच्या या परंपरेचे चौथे आध्यात्मिक प्रमुख दाजी एका तिसर्या गोष्टीवर - स्पिरिच्युअल अॅनाटोमीवर - प्रकाश टाकतात, जिची आपण बहुधा उपेक्षा करतो. चेतना आणि आध्यात्मिक ऊर्जेची केंद्रे - चक्रे, ज्यांनी आपली स्पिरिच्युअल अॅनाटोमी बनते, ते एका नकाशाचे कार्य करत आपल्याला परत स्वतःकडे, आपल्या हृदयाकडे आणि त्या परम स्थायी सुखाकडे घेऊन जातात, ज्याची आपल्याला आस असते. या पुस्तकात वाचकांना चक्रांची भूमिका आणि त्यांचे महत्त्व; चक्रांमधील अवरोध आण�... See more
आरोग्याबद्दल आपण नेहमी असाच विचार करतो की, केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपले शरीर, मन आणि जीवनामध्ये शांती, उद्देश आणि संबंध प्रदान करतो; परंतु हार्टफुलनेस आणि राजयोगाच्या या परंपरेचे चौथे आध्यात्मिक प्रमुख दाजी एका तिसर्या गोष्टीवर - स्पिरिच्युअल अॅनाटोमीवर - प्रकाश टाकतात, जिची आपण बहुधा उपेक्षा करतो. चेतना आणि आध्यात्मिक ऊर्जेची केंद्रे - चक्रे, ज्यांनी आपली स्पिरिच्युअल अॅनाटोमी बनते, ते एका नकाशाचे कार्य करत आपल्याला परत स्वतःकडे, आपल्या हृदयाकडे आणि त्या परम स्थायी सुखाकडे घेऊन जातात, ज्याची आपल्याला आस असते. या पुस्तकात वाचकांना चक्रांची भूमिका आणि त्यांचे महत्त्व; चक्रांमधील अवरोध आणि त्यांची सफाई; आपल्याला आपल्या हृदयाच्या केंद्राजवळ घेऊन जाणारे ध्यानाचे सराव; चक्रांशी सखोलतेने जोडून घेतल्याने कशा प्रकारे आपले हृदय, मन आणि आत्मा मुक्तपणे प्रकट होतात यांबाबत मार्गदर्शन मिळेल. हे पुस्तक जितके प्राचीन योग तत्त्वज्ञानाच्या मुळापर्यंत जाते, तितकेच ते आधुनिकतम संशोधनांवर प्रकाश टाकते म्हणूनच एखाद्या जिज्ञासूने, एखाद्या ध्यान करणार्याने आणि जो कोणी आपल्या जीवनात आनंदाचा शोध घेत आहे, त्याने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे.