शिवराज्याभिषेकाची सर्व इतिहासकारांच्या नजरेतून समग्र माहिती देणारा, उच्चनिर्मितीमूल्य असलेला मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ ! शिवराज्याभिषेक मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९-२० व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्य विश्वातील मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर�... See more
शिवराज्याभिषेकाची सर्व इतिहासकारांच्या नजरेतून समग्र माहिती देणारा, उच्चनिर्मितीमूल्य असलेला मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ ! शिवराज्याभिषेक मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९-२० व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्य विश्वातील मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच या ग्रंथात आधुनिक इतिहासकार-अभ्यासकांनी राज्याभिषेकासंदर्भात केलेले लेखन ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली एका सूत्रात गुंफण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाची सांगोपांग माहिती देत या घटनेमुळे झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उत्क्रांतीची चर्चा करणारा मराठी साहित्यविश्वातील हा एक अद्भुत प्रयोग आहे.