शिवनेत्र बहिर्जी 🚩 शिवाजी राजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे आणि ह्या सर्वांच नेतृत्व करत होते बहिर्जी नाईक. नाईकांनी आपले सर्व गुप्तहेर विजापूर, दिल्ली, सुरत, औरंगाबाद, गोवळकोंडा, आग्रा, अहमदाबाद, बुऱ्हाणपूर इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्यास 'कडॆलोट' असा नियम नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांनाच कळे. त्यात वाऱ्याचे,पक्षांचे, आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित �... See more
शिवनेत्र बहिर्जी 🚩 शिवाजी राजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे आणि ह्या सर्वांच नेतृत्व करत होते बहिर्जी नाईक. नाईकांनी आपले सर्व गुप्तहेर विजापूर, दिल्ली, सुरत, औरंगाबाद, गोवळकोंडा, आग्रा, अहमदाबाद, बुऱ्हाणपूर इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्यास 'कडॆलोट' असा नियम नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांनाच कळे. त्यात वाऱ्याचे,पक्षांचे, आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असे. नाईक त्या ठिकाणची खडानखडा माहिती काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत. दरबारातही नाईक जर वेशांतर करुन आलेले असतील तर त्यांना फक्त महाराजच ओळखायचे. दरबारात बहिर्जी नाईक नावाचा कोणी इसम आहे हेच इतर दरबाऱ्याना ठाऊक नव्हते. त्यांच्या इतक्या गुप्तकार्यामुळेच ते महाराष्ट्राच्या इतिहासात गहाळ झाले ... परंतु अशा इतिहासात गढून गेलेल्या बहिर्जी नाईकांच्या जीवनकार्यावर साडेतीनशे वर्षानंतर संशोधनपर प्रकाश टाकला आहे तो लेखक प्रेम धांडे ह्यांनी.... 2021साली त्यांची शिवनेत्र बहिर्जी ही वाचकांना मंत्रमुग्ध करणारी कादंबरी प्रकाशित झाली ... गेल्या 3 वर्षांपासून बेस्टसेलर असलेली ही बहिर्जी नाईकांच्या जीवनावरची पहिलीच,अभ्यासपूर्ण कादंबरी ठरली. ह्या कादंबरीचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत... तमाम मराठी वाचक मावळ्यांनी बहिर्जी नाईकांच्या पराक्रम गाथेला अवश्य वाचावं...आणि शिवप्रेमात भिजून जावं....