रामायण आणि महाभारत हे भारतीय महाकाव्य आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन या महान ग्रंथातून घडते. असे म्हटले जाते, जगात जे आहे ते सगळे महाभारतात आहे. अशा या ग्रंथातील गोष्टी अनेक पिढ्यांतील मुलांवर सर्वांगीण संस्काराचे काम करत करत आल्या आहेत. आदर्श नागरिकाकरिता काय करावे. मुलात नेतृत्व गुण कसे वाढीस लावावे. देशप्रेम, मातृप्रेम आणि बंधुत्वाची आजची गरज. गोष्टीतून मनोरंजन आणि संस्काराची इथे वाढ होत जाते. गोष्ट वाचताना मजेदार खेळ खेळण्याचाही आनंद मिळतो. तर मग वाचा या गोष्टी! यातून मिळेल संस्काराचे अमृतमंथन.