TCS व IBPS या संस्थांकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात येऊन त्या आधारे राज्य शासनाकडून विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची पदे भरली जात आहेत. आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून गट क संवर्गातील पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक ही पदे भरण्यासाठी IBPS या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या पदांसाठी मराठी भाषा (२५ प्रश्न), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न), सामान्यज्ञान (२५ प्रश्न), बुद्धिमापन चाचणी व अंकगणित (२५ प्रश्न) या प्रमाणे एकूण १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जाणे अपेक्षित आहे. उपरोक्त अभ्यासक्रमाचा यथायोग्य विचार करून अस्मादिकांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील ... See more
TCS व IBPS या संस्थांकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात येऊन त्या आधारे राज्य शासनाकडून विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची पदे भरली जात आहेत. आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून गट क संवर्गातील पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक ही पदे भरण्यासाठी IBPS या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या पदांसाठी मराठी भाषा (२५ प्रश्न), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न), सामान्यज्ञान (२५ प्रश्न), बुद्धिमापन चाचणी व अंकगणित (२५ प्रश्न) या प्रमाणे एकूण १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जाणे अपेक्षित आहे. उपरोक्त अभ्यासक्रमाचा यथायोग्य विचार करून अस्मादिकांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारली आहे. ही रचना साकारताना प्रकाशनाच्याच अनेक आवृत्त्या व अनेक पुनर्मुद्रणे झालेल्या संपूर्ण तलाठी या पुस्तकातील या परीक्षेस समान असलेला अभ्यासक्रम समाविष्ट करून पुस्तकाची रचना साकारली आहे. अर्थातच, संपूर्ण तलाठी या पुस्तकातील यशोदायी मॅटरमुळे प्रस्तुतच्या पुस्तकाची उपयुक्तता अधिकच वाढली आहे. ज्यांच्याकडे अगोदरच या वर्षीचे संपूर्ण तलाठी हे पुस्तक असेल, त्यांनीही ही बाब लक्षात घ्यावी. त्यांनी संपूर्ण तलाठी या पुस्तकाच्या जोडीने जिल्हा परिषद भरती परीक्षा पुस्तक अभ्यासल्यास त्यांना ते अधिक फलदायी व अधिक यशोदायी ठरेल. महाराष्ट्रविषयक व भारतविषयक सामान्य माहिती आणि महाराष्ट्रावर (व महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर) तद्वतच भारतावर आधारित प्रश्नही मोठ्या संख्येने दिले आहेत. वरील सर्व बाबी लक्षात घेता आपला एक 'आदर्श' व 'विश्वासू मित्र' ठरण्याचे भाग्य या पुस्तकास लाभेल, असा सार्थ विश्वास वाटतो.