एकोणिसाव्या शतकाचा भारतीय इतिहास हा अत्यंत संवेदनशील आणि क्रांतीकारी इतिहास आहे. या इतिहासाच्या आशयद्रव्यातून एखादी कलाकृती उभी करणे हे तसे धाडसाचे. या कालखंडातील क्रांतीकारी प्रबोधन कलेच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवत असताना 'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी मानवतावादी मूल्यांची पेरणी करते. इतिहासातील संघर्ष हा कोणत्याच धर्माचा व जातीपातीचा संघर्ष नव्हता तर तो विधायक आणि विघातक प्रवृत्तींमधील संघर्ष होता. सामाजिक समस्यांना विरोध करताना तत्कालीन सुधारकांचे योगदान विसरता येणार नाही. प्रस्तुत कादंबरी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी व युगप्रवर्तक संघर्ष �... See more
एकोणिसाव्या शतकाचा भारतीय इतिहास हा अत्यंत संवेदनशील आणि क्रांतीकारी इतिहास आहे. या इतिहासाच्या आशयद्रव्यातून एखादी कलाकृती उभी करणे हे तसे धाडसाचे. या कालखंडातील क्रांतीकारी प्रबोधन कलेच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवत असताना 'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी मानवतावादी मूल्यांची पेरणी करते. इतिहासातील संघर्ष हा कोणत्याच धर्माचा व जातीपातीचा संघर्ष नव्हता तर तो विधायक आणि विघातक प्रवृत्तींमधील संघर्ष होता. सामाजिक समस्यांना विरोध करताना तत्कालीन सुधारकांचे योगदान विसरता येणार नाही. प्रस्तुत कादंबरी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी व युगप्रवर्तक संघर्ष अधोरेखित करते.नव्या पिढीला इतिहास पारदर्शीपणे व तटस्थपणे सांगणाऱ्या 'मी सावित्री जोतीराव' या कादंबरीची समकालीन प्रस्तुतता प्रखर सामाजिक भान व्यक्त करणारी आहे. एकविसाव्या शतकात धार्मिकता पुन्हा टोकदार होत आहे. एकीकडे विज्ञानवादी होत असताना धार्मिक टोकदारपणा शिगेला पोहोचतोय. महात्मा जोतीराव फुले यांनी बुद्धिवादाचा पुरस्कार करत तर्काच्या कसोटीवर बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून धर्माला तपासले आणि मानवतावादी विचारांची प्रतिष्ठापना केली.