‘मानवी विकासाचे अर्थशास्त्र’ हे अत्यंत अभ्यास व महत्त्वपूर्ण सर्वसमावेशक संदर्भ पुस्तक आहे. विकास हा प्रत्येक समाजाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा उद्देश असतो. या विकासक्रमाचे सामाजिक आणि व्यक्तीगत विकास अशी दोन अंगे असतात आणि ती परस्पराशी संबंधित असतात. मानवी विकासाचे निर्देशक, अनुभव, संशोधन, प्रायोगिक सिद्धता अशा अनेक कसोट्यावरुन मनुष्य ही माणसांचीच निर्मिती आहे. मनुष्य हा विकासाचा केंद्रबिंदू असून या विकासाची मुख्यशक्ती मनुष्यबळ हीच असते. प्रस्तुत संदर्भपुस्तक पाच विभागामध्ये विभाजित केले असून आधुनिक लोकसंख्येचे सिद्धांत, मानव विकासाचे स्वरुप व मानव विकासाच्या मापनाकरिता मानव विकास निर्देश�... See more
‘मानवी विकासाचे अर्थशास्त्र’ हे अत्यंत अभ्यास व महत्त्वपूर्ण सर्वसमावेशक संदर्भ पुस्तक आहे. विकास हा प्रत्येक समाजाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा उद्देश असतो. या विकासक्रमाचे सामाजिक आणि व्यक्तीगत विकास अशी दोन अंगे असतात आणि ती परस्पराशी संबंधित असतात. मानवी विकासाचे निर्देशक, अनुभव, संशोधन, प्रायोगिक सिद्धता अशा अनेक कसोट्यावरुन मनुष्य ही माणसांचीच निर्मिती आहे. मनुष्य हा विकासाचा केंद्रबिंदू असून या विकासाची मुख्यशक्ती मनुष्यबळ हीच असते. प्रस्तुत संदर्भपुस्तक पाच विभागामध्ये विभाजित केले असून आधुनिक लोकसंख्येचे सिद्धांत, मानव विकासाचे स्वरुप व मानव विकासाच्या मापनाकरिता मानव विकास निर्देशांक या मापदंडाबरोबरच अन्य महत्त्वपूर्ण निर्देशांकांची मांडणी करण्यात आली. एकंदरीत, पुस्तकातील मजकूर हा मानवी विकासाच्या सर्व पैलूंचे अतिशय सखोल विवेचन करतो. मानवी विकासाशी निगडित प्रमुख सिद्धांतकारांचे योगदान, सामाजिक सेवांवरील खर्च, भांडवल, मानवी हक्क व दुर्बल वर्गासोबतच गरीब व वंचित घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकातील तथ्ये अचूक आणि अद्यावत असून ते मानवी विकासाचे एक सखोल विहंगावलोकन प्रदान करते. सोपी भाषा, उपयोजित उदाहरण व अंमलबजावणी आणि वास्तविक जीवन जगण्याच्या अनेक मुद्यांचा समावेश आहे. ज्यामुळे पुस्तकातील मजकूर अधिक मौल्यवान आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.