या ग्रंथात संप्रदायवादाचे मुख्य घटक आणि आधुनिक भारतात त्याच्या वाढीच्या कारणांचे विश्लेषण आहे. संप्रदायवाद जसा आहे तसा समजून घेऊन, त्याचा अर्थ लावून त्याची पोलखोल करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. खेरीज, वसाहतीच्या राजवटीत त्याचा उगम, विकास आणि त्या काळातली त्याची पाळेमुळे, सामाजिक घटक निश्चित करण्याचा, तसेच संप्रदायवाद फाळणीत परिणत का झाला, ती कारणे शोधण्याचा लेखकाचा प्रयास आहे. या प्रक्रियेत, स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे जे पैलू संप्रदायवादाच्या वाढीला पोषक ठरले त्यावर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. व्यापक व्यासंगावर आधारित असलेला ह�... See more
या ग्रंथात संप्रदायवादाचे मुख्य घटक आणि आधुनिक भारतात त्याच्या वाढीच्या कारणांचे विश्लेषण आहे. संप्रदायवाद जसा आहे तसा समजून घेऊन, त्याचा अर्थ लावून त्याची पोलखोल करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. खेरीज, वसाहतीच्या राजवटीत त्याचा उगम, विकास आणि त्या काळातली त्याची पाळेमुळे, सामाजिक घटक निश्चित करण्याचा, तसेच संप्रदायवाद फाळणीत परिणत का झाला, ती कारणे शोधण्याचा लेखकाचा प्रयास आहे. या प्रक्रियेत, स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे जे पैलू संप्रदायवादाच्या वाढीला पोषक ठरले त्यावर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. व्यापक व्यासंगावर आधारित असलेला हा अभ्यास आपल्याला दाखवून देतो की, संप्रदायवाद वाढवण्यास ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाने कसा हातभार लावला आणि शेवटी संप्रदायवाद कसा नियंत्रणाबाहेर गेलेल्या राक्षसात परिवर्तित झाला. संप्रदायवाद हे भारताच्या ऐतिहासिक विकासाचे तर्कसंगत आणि अटळ अपत्य होते; ही संकल्पना लेखकाने नाकारली आहे. उलटपक्षी लेखक ठामपणे प्रतिपादन करतात की, संप्रदायवाद केवळ भूतकाळातला अवशेष किंवा इतिहासातला अपघात नव्हता. संप्रदायवाद आधुनिक, सामाजिक आणि राजकीय संकट होते आणि जर काही विशिष्ट सामाजिक, राजकीय आणि वैचारिक अटींची पूर्तता झाली असती तर त्याच्यावर अंकुश - नियंत्रण ठेवता आले असते आणि अगदी निर्मूलनही करता आले असते. देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या आणि आजच्या भारतात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या संप्रदायवादाच्या दलदलीतून बाहेर निघण्याचा उपाय सुचवून लेखकाने समारोप केला आहे.