प्रचंड खपाच्या 'कलेक्टर साहिबा' या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही �... See more
प्रचंड खपाच्या 'कलेक्टर साहिबा' या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. --------स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्या उभ्या राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून ते परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावे, तर समाज मान्यता देत नाही; लग्न होत नाही म्हणून त्यांच्यावर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरू होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचे खच्चीकरण होते; काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे