वेगळ्या जीवनानुभवाचा सर्जनात्मक आविष्कार असलेली कसदार कादंबरी चिगूर किल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी गावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून
लेखकाविषयी : मनोज कुलकर्णी 'अडीच अक्षरांचा प्रवास' हा कथासंग्रह प्रकाशित. पत्रकारितेच्या क्षेत्रात २००५पासून कार्यरत. मुद्रित आणि इल... See more
वेगळ्या जीवनानुभवाचा सर्जनात्मक आविष्कार असलेली कसदार कादंबरी चिगूर किल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी गावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून
लेखकाविषयी : मनोज कुलकर्णी 'अडीच अक्षरांचा प्रवास' हा कथासंग्रह प्रकाशित. पत्रकारितेच्या क्षेत्रात २००५पासून कार्यरत. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया दोन्हींचा अनुभव. पत्रकार दिनी (२०२३) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित; देवर्षी नारद युवा पुरस्कार (२०१८); विजय सूर्यवंशी स्मृती पुरस्कार(२०२०) आदी सन्मान