‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सत... See more
‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!