भारताचा प्रदीप्त इतिहास वीरांप्रमाणे इथल्या वीरनारींच्याही पराक्रमाचा साक्षीदार आहे. परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगनांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं तसंच अंतर्गत बंडखोरांचं दमन करून सुराज्य प्रस्थापित केलं. लोकप्रशासन, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी, अर्थकारण, न्यायव्यवस्था, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक पैलूंनी त्यांचं कर्तृत्व समृद्ध होतं. गत दोन सहस्रकांमधल्या या निवडक गाथांमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण आणि प्रवाही संस्कृतीचं एकात्म सूत्र आपल्याला जाणवतं. संकीर्ण धाग्यांनी विणलेल्या स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत उपेक्षेच्या सावटाखाली असलेल्या त्यांच्या योगदानावर टाकलेला हा... See more
भारताचा प्रदीप्त इतिहास वीरांप्रमाणे इथल्या वीरनारींच्याही पराक्रमाचा साक्षीदार आहे. परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगनांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं तसंच अंतर्गत बंडखोरांचं दमन करून सुराज्य प्रस्थापित केलं. लोकप्रशासन, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी, अर्थकारण, न्यायव्यवस्था, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक पैलूंनी त्यांचं कर्तृत्व समृद्ध होतं. गत दोन सहस्रकांमधल्या या निवडक गाथांमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण आणि प्रवाही संस्कृतीचं एकात्म सूत्र आपल्याला जाणवतं. संकीर्ण धाग्यांनी विणलेल्या स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत उपेक्षेच्या सावटाखाली असलेल्या त्यांच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाशझोत आहे. भारतीय स्त्रीच्या सामर्थ्याचे, स्वाभिमानाचे आणि समर्पणाचे हे तेजस्वी अध्याय म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे. "शौर्य, प्रशासन आणि स्वातंत्र्य असे कर्तृत्वाचे तीन धागे घट्ट पकडून इतिहासावर आपली छाप सोडणाऱ्या वीरांगनांचे चरित्र अभ्यासपूर्वक, एकत्रित स्वरूपात सर्वांसमोर ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मेजर मोहिनी हिने या ग्रंथाच्या माध्यमातून केले आहे. ही खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे. स्त्रीशक्तीचं दर्शन घडवणाऱ्या तिच्या या ग्रंथप्रयासास मनापासून शुभेच्छा!'' पद्मभूषण मा. सुमित्राताई महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा.